29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजी आमदार दिलीप वाघ यांना व्यापाऱ्यांचा उदंड प्रतिसाद प्रचंड विजयाचा दिला विश्वास!

  1. पाचोरा- माजी आमदार दिलीप वाघ यांनी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचाराचा गतिमान वेग घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिलीपभाऊ वाघ यांनी पाचोरा शहरामधील महाराणा प्रताप चौक, भडगाव रोड, विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स,मार्केट कमिटी,स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट तसेच पाचोरा शहरातील सुवर्णपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी चौक इत्यादी महत्वपूर्ण भागात आपल्या प्रचार दौऱ्याचे नियोजन केले होते.

    यावेळी त्यांनी शहरातील सोन्याचे व्यापारी आणि सुवर्णपेढी यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व बाजारपेठातून दिलीपभाऊ वाघ यांनी भेटी दिल्या. यावेळी कापड,किराणा,इलेक्ट्रॉनिक्स,भांडी,हॉटेल, सुपर मार्केट, दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिक, पुस्तक व जनरल स्टोअर्स अशा विविध व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत दिलीपभाऊ वाघ यांनी प्रचाराची सूत्र वेगवान केले.
    व्यापारी वर्गांनी देखील जल्लोषात त्यांचे स्वागत करत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.यावेळी दिलीप वाघ यांच्या झालेल्या छोट्याशा भेटीत देखील सदिच्छा देताना व्यापारी बांधवांनी भविष्यातील आमदार म्हणून दिलीप वाघ यांनी पाचोरा शहरातील व्यापार व उद्योग व्यवसायांना गतिमान बनवून चालना द्यावी अशा शुभेच्छा देखील दिल्या.यावेळी त्यांचे बंधू संजयनाना वाघ यांचे समवेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचार कार्यात सहभागी झाल्याचे दिसून आले. व्यापारी बांधवांनी देखील लक्ष्मीपूजनाचा प्रसाद देत दिलीप वाघ यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि पाचोरा शहरातील व्यापारी बांधव त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा असल्याचे देखील बोलून दाखवले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!