24.2 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

आईच्या विजयासाठी सरसावल्या लेकी वैशालीताईंसाठी सिध्दी व निधी उतरल्या मैदानात

पाचोरा, दिनांक 29 (प्रतिनिधी ) :* एकीकडे तात्यासाहेब आर. ओ. पाटलांची कन्या आपल्या वडलांच्या वारसा सांभाळण्यासाठी निकराची लढाई लढत असतांना आता त्यांच्याच कन्या आपल्या मातेच्या मदतीला धावून आल्याचे चित्र आज मतदारसंघाने पाहिले. याचमुळे सगळीकडेच कु. सिध्दी कु. निधी सुर्यवंशी यांचे कौतुक होत आहे.पाचोरा विधानसभा मतदारसंघातून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी परिवर्तनाचा नारा बुलंद करत जोरदार प्रचार सुरू केला असून त्यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या दिवसापासून त्यांचे पती नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी हे देखील त्यांच्या सोबतीला जनसामान्यांची सेवा करण्यात अग्रेसर असल्याचे मतदारसंघाने पाहिले आहे. सुर्यवंशी दाम्पत्याच्या जोडीला महाविकास आघाडीसह मतदारांचे देखील पाठबळ लाभले आहे. यातच आता कु. सिध्दी आणि कु. निधी नरेंद्रसिंग सुर्यवंशी या देखील मैदानात उतरल्या आहेत.कु. सिध्दी या वैशालीताईंच्या ज्येष्ठ कन्या असून त्या बायोटेक्नोलॉजी या विषयात फर्ग्युसन कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्या आता समाजसेवेत सक्रीय झाल्या आहेत. वैशालीताई सुर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजीत सभेत त्या व्यासपीठावर दिसून आल्या. यानंतर त्यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे. आज त्यांनी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये जाऊन आपली माता वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाठी मते मागितले. यांच्या जोडीला त्यांची लहान बहिण निधी या देखील आपल्या आईसाठी जनतेला मतांचा जोगवा मागत आहेत.एकीकडे स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशालीताई सुर्यवंशी या त्यांचा वारसा सांभाळण्यासाठी मातब्बरांची झुंज घेत असतांना तात्यासाहेबांच्याच कुटुंबातील तिसरी पिढी ही सिध्दी व निधीच्या माध्यमातून समोर आल्याचे पाहून आज अनेक मतदारांनी या दोघींचे भरभरून कौतुक करत ताईंच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. आज सोशल मीडियात देखील निधीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!