भव्य सभेत फुंकले रणशिंग : सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
पाचोरा, दिनांक ”गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी मतदारसंघात आपुलकी निर्माण केली आहे. जर आपल्याला जनतेचे काम करणाऱ्या आमदार निवडून द्यायचा असेल तर त्याच एकमेव पर्याय आहेत. याचमुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघातून त्यांचा विजय निश्चीत आहे !” अशा शब्दात युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते वैशालीताई सुर्यवंशी यांचा अर्ज भरण्याआधी आयोजीत भव्य सभेत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले.वैशालीताई सुर्यवंशी यांची पाचोरा विधानसभा मतदारसंघातून दोन दिवस आधीच उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना ‘एबी फॉर्म’ देखील प्रदान करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर, त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली. आज सकाळी अर्ज दाखल करण्याआधी वैशालीताई सुर्यवंशी यांनी मतदारसंघातील विविध देवस्थानांवर माथा टेकवून आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून आईंसह ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. यानंतर वरखेडी रोडवरील गुरूकुल स्कूल जवळच्या मैदानावर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. आदित्य ठाकरेंचे आगमन होण्याआधी शेतकरी सेना तालुका प्रमुख रमेश बाफना, डॉ. एस.एस.पाटील, गणेश परदेशी, ॲड.अभय पाटील, एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ, उत्तर महाराष्ट्र भिम आर्मीचे अध्यक्ष संजय सपकाळे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, अध्यक्ष मोरसिंग राठोड, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा शिंदे, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती इस्माईल फकीरा, एकलव्य आदिवासी संघटना प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ, उत्तर महाराष्ट्र भिम आर्मीचे अध्यक्ष संजय सपकाळे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्षक वाल्मिक जाधव आणि सागर गवते या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मनोगतातून सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केले. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.दुपारी साडेबाराच्या सुमारास आदित्य ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर त्यांचे अतिशय उत्स्फुर्त असे स्वागत करण्यात आले. प्रारंभी वैशालीताई सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रारंभीच जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होता येणार नसल्याचे कृतज्ञपणे नमूद करत त्यांनी मतदारसंघातील जनतेला अक्षरश: शिरसाष्टांग दंडवत नमस्कार घातला तेव्हा हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारे लोक भारावले. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी या अतिशय भावविवश झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, मी आर. ओ. तात्यासाहेबांचा सेवेचा वारसा पुढे चालवत आहे. आपण विकासाचा संकल्प घेतला असून मतदारसंघात जनतेशी संवाद साधतांना यंदा येथे परिवर्तन नक्कीच होणार असल्याचे मला दिसून आले आहे. मतदारसंघात दहशतीचे वातावरण असून येथे सत्ताधारी व विरोधकांमध्ये 60 : 40 पॅटर्न असून सर्वत्र सेटींग आहे. या सर्व बाबींमुळे विकास झाला नाही. तीच उरलेली सर्व काम मला करावयाची आहेत. माझ्या स्त्री असल्यावरून टिका होत असली तरी ती गैर होय. मी महिला असली तरी सक्षम असून चौघा पुरूष उमेदवारांना भारी पडणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. तर, पाचोऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.या नंतर आदित्य ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण केले. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, माझा अर्ज भरल्यानंतर मी राज्यात पहिल्यांदाच पाचोरा येथे अर्ज भरण्यासाठी आला आहे. कारण आमचे स्व. आर. ओ. तात्यासाहेब पाटील यांच्या कुटुंबाशी आपले ऋणानुबंध असल्यामुळे आज मी वैशालीताई यांचा अर्ज भरण्यासाठी येथे आलो आहे. याप्रसंगी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, राज्यातील गद्दार खोके सरकारने जनतेसाठी काहीही केले नाही. दोन वर्षात राज्यात एकही रोजगार आला नाही. आमच्या सरकारने साडे सहा लाख रूपयांची गुंतवणूक आणली. मात्र घटनाबाह्य सरकारने सर्व रोजगार गुजरातला पाठविले. यामुळे आज कुणालाच नोकऱ्या मिळत नाहीत. आमचे सरकार पुन्हा राज्यात आल्यास प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजीत करून तरूणांना नोकरी देणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. आमच्यासाठी रोजगारालाच प्राधान्यक्रम असेल असे ते म्हणाले. तर आमचे सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेत वाढीव रक्कम देतांनाच सुरक्षित बहिण योजना देखील आणू असेही ते म्हणाले.दरम्यान, आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपने 2014 साली पंधरा लाखांचे आश्वासन दिले असले तरी हातात पंधराशे दिले. आम्ही लाडकी बहिण योजना तर सुरू ठेवूच पण सोबत सुरक्षित बहिण योजना देखील आणू अशी घोषणा त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. तर, त्यांनी वैशालीताई सुर्यवंशी या करत असलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. दोन वर्षांपासून त्या पायाला भिंगरी लाऊन जनतेची सेवा करत असून असे करणाऱ्या त्या एकमेव उमेदवार आहेत. तसेच जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चीत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. राज्यातील सद्यस्थिती बदलवायची असेल तर परिवर्तन आवश्यक आहे. आणि परिवर्तनासाठी आपल्याला मशाल प्रज्वलीत करावी लागणार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. तर विविध मुद्यांवरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला मैदान अगदी तुडुंब भरले होते. हजारोंच्या संख्येने मतदारसंघातील स्त्री-पुरूष याप्रसंगी उपस्थित होते. सभेत महिला व तरूणांचे प्रमाण लक्षणीय असेच होते. तर भाषणाच्या मध्ये दिलेल्या जोरदार घोषणांमुळे परिसरात चैतन्यदायी वातावरण निर्मित झाले. उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच वैशालीताई सुर्यवंशी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, शिवसेना-उबाठाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सुनील पाटील, चाळीसगाव मतदार संघाचे उबाठाचे उमेदवार माजी खासदार उन्मेषदादा पाटील, करण पवार, पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी, विराज कावडिया, शरद तायडे, डॉ.एस.एस.पाटील, डॉ. जे.सी. राजपुत, डी.आर.देशमुख, दिपकसिंग राजपूत, उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, अभय पाटील, शरद पाटील, राजेंद्र भैय्या, राजेंद्र देवरे, बालू आण्णा पाटील, सागर वाघ, चंदू केसवानी, भरत खंडेलवाल, दिपक पाटील, गणेश परदेशी, जे.के. पाटील, रविंद्र पोपट पाटील, शंकर मारवाडी, मनोहर चौधरी, मच्छिंद्र आबा, राजेंद्र पाटील, सतिष पाटील, तुकाराम माळी, रतन परदेशी, गोरख पाटील, श्याम सर, राजेश काळे, अनिल सावंत, दिपक पाटील, विकास वाघ, हरीभाऊ पाटील, राकेश सोनवणे, तुकाराम पाटील, दादाभाऊ चौधरी, मनोज चौधरी, हरिष देवरे, आण्णा परदेशी, हिलालदादा, भास्कर धनजी पाटील, बंटी हटकर, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, विनोद बाविस्कर, धनराज विसपुते, राहुल संघवी, रसूल शेठ, गफ्फारभाई, शशी पाटील, प्रशांत पाटील, धर्मराज पाटील, एकनाथ महाराज (एकलव्य), सिकंदर तडवी, अस्मिता पाटील, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, रेखाताई बाविस्कर, लक्ष्मीताई पाटील, पुष्पाताई परदेशी, जयश्री येवले, कुंदन पंड्या, अनिता पाटील, मनिषा पाटील, कैलास फकिरा, क्षीरसागर सरपंच, अरूण तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, पप्पु राजपूत, पप्पू जाधव, अमजद पठाण, ईस्माइल भैय्या, नंदू सोनार, अविनाश भालेराव, रतिलाल महाजन, प्रदिप पाटील, दिलीप शेंडे, चेतन रंगनाथ पाटील, माधव जगताप, सुनिल शिंदे, नंदू सोनार, ॲड. भोईटे आण्णा पाटील, अविनाश भालेराव, उत्तम महाजन, संजू नाना महाजन भोरटेक, प्रभु पाटील, दत्ता आबा पाटील, सुशिल महाजन, यश बिरारी, रोनीत अहिरे, प्रथमेश गायकवाड, हितेश महाजन, सोनु सिरसे, नरेंद्रसिंग सुर्यंवशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तर उपस्थितांमध्ये शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.