शिवसेना नेते तथा युवासेना मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे आज शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी 10.45 वा. जळगाव विमानतळ* येथे त्यांचे आगमन होणार आहे.
11 वा. गुरूकुल शाळेजवळ सिंधी कॉलनी, पाचोरा येथे सभेला संबोधित करणार आहेत. तद्नंतर सिंधी कॉलनी ते प्रांत कार्यालय पाचोरा पर्यंत रोड-शो आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी 1 वा. प्रांत कार्यालय, पाचोरा येथे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पोचारा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 3 वा. जळगाव विमानतळ येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख श्री.संजयजी सावंत साहेब व युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी दिली आहे.