29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारत चीन करारावर कॉंग्रेसची जोरदार टीका; जयराम रमेश यांनी विचारले ‘हे’ ६ प्रश्‍न

India-China agreement – पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या कराराची घोषणा झाल्यानंतर आता कॉंग्रेसने यावर टीका केली आहे. भारत आणि चीन यांच्या गेल्या वर्षांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षासाठी कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरत दोष दिला असून त्यांना सहा प्रश्‍नही विचारले आहेत.

 

कॉंग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, चीनच्या बाबतीतील हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अज्ञानाचा प्रकार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना चीनने मोदींचे तीनदा भव्य स्वागत केले होते.

पंतप्रधान म्हणून, त्यांनी चीनला पाच अधिकृत भेटी दिल्या आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्यासोबत १८ बैठका घेतल्या, ज्यात त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त साबरमतीच्या काठावरील एका मैत्रीपूर्ण झोपाळा सत्राचाही समावेश आहे.

१९ जून २०२० रोजी जेंव्हा पंतप्रधानांनी चीनला आपली कुप्रसिध्द क्लिन चिट दिली तेंव्हा भारताची परिस्थिती सर्वात खालच्या टप्प्यावर पोहोचली. कोणीही आमची सीमा ओलांडली नाही किंवा कोणीही घुसखोरी केली नाही.

हे विधान गलवान चकमकीच्या अवघ्या चार दिवसांनंतर करण्यात आले आहे होते. त्या संघर्षात आमच्या 20 शूर सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले होते.

हा आमच्या शहीद सैनिकांचा घोर अपमान होता, यामुळे चीनच्या आक्रमकतेला कायदेशीर मान्यता मिळाली आणि त्यामुळे एलएसीवरील विरोधाचे वेळेवर निराकरण करण्यात अडथळा निर्माण झाला.

संपूर्ण संकटाकडे मोदी सरकारच्या दृष्टिकोनाचे वर्णन डीडीएलजे म्हणजे नाकारणे, वळवणे, खोटे बोलणे आणि समर्थन करणे असे केले जाऊ शकते असेही जयराम रमेश म्हणाले.

यादरम्यान, संसदेला वादविवाद आणि चर्चेची संधी दिली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला. चीनसोबत हा करार झाल्यानंतर सरकारने भारतातील जनतेला विश्वासात घेऊन या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी रमेश यांनी केली.

1.. भारतीय सैनिक डेपसांगमधील आमच्या हक्काच्या रेषेपर्यंत, बॉटलनेक जंक्शनच्या पलीकडे असलेल्या पाच गस्ती बिंदूंपर्यंत गस्त घालू शकतील का, जसे ते पूर्वी करू शकत होते?

2. आमचे सैन्य डेमचोकच्या तीन पेट्रोलिंग पॉईंटपर्यंत पोहोचू शकतील का, जे चार वर्षांहून अधिक काळ हद्दीपासून दूर आहेत?

3. आमचे सैन्य पँगॉन्ग त्सोमधील फिंगर 3 पर्यंतच मर्यादित असेल का, जे पूर्वी ते फिंगर 8 पर्यंत जाऊ शकत होते?

4. आमच्या गस्तीला गोगरा-हॉट स्प्रिंग्स परिसरातील तीन गस्ती बिंदूंपर्यंत पोहोचण्याची परवानगी आहे का, जिथे ते आधी जाऊ शकत होते?

5. भारतीय पशुपालकांना पुन्हा एकदा हेल्मेट टॉप, मुक्पा रे, रेजांग ला, रिन्चेन ला, टेबल टॉप आणि गुरूंग हिल मधील चुशूलमधील पारंपारिक कुरणांमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार दिला जाईल का?

६. आमच्या सरकारने चीनला दिलेले बफर झोन, ज्यात युद्धवीर आणि मरणोत्तर परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंग यांचे रेझांग ला येथील स्मारक स्थळ आहे, ते आता भूतकाळातील गोष्टी आहेत का?

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!