शेतकऱ्याची पिळवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाचे मोठे पाऊल
आज भडगाव येथे एका तक्रारदाराच्या तक्रारी वरुन २ खत विक्रेत्यांच्या जिल्हा स्तरीय भरारी पथका कडुन तपासणी करण्यात आली .या मध्ये दोन्ही खत विक्रेत्यांनी दुकानात युरीया असुन ही तक्रारदारास २ गोण्या युरीया विक्री करणे नाकारले होते.संबंधीत तक्रारदाराकडुन आज सकाळी जिल्हा स्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार प्राप्त होताच , तातडीने जिल्हा स्तरीय भरारी पथकाचे प्रमुख श्री.पद्मनाभ म्हस्के,कृषी विकास अधिकारी आणि श्री.राठोड तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे भडगाव मध्ये हजर झाले,यावेळी डमी कस्टमर (बनावट ग्राहक) पाठवुन २ गोण्या युरीया ची मागणी करण्यात आली मात्र संबंधीत खत विक्रेते यांनी २ गोण्या युरीयाची विक्री करण्यासही संबंधीत बनावट ग्राहकास नकार दिला . बनावट ग्राहकाने हा पुर्ण घटनाक्रम in camera shooting करुन घेतला ,या विडीओ ची खात्री झाल्यानंतर जिल्हा स्तरीय भरारी पथक भडगाव मधील त्या दोन दुकानात गेले , तेव्हा प्रत्यक्ष एका दुकानात २२० तर एका दुकानात ३६ गोण्या युरिया आढळून आला आहे.प्रत्यक्ष दुकानात युरीया असुन ही युरीया विक्रीस नकार देणार्या या दोन्ही दुकानदारांच्या खत परवान्यावर ऐन खरीप हंगामात गंडांतर लवकरच येणार असल्याचे सुतोवाच जिल्हा स्तरीय भरारी पथका कडून मिळाले आहेत .युरीया २६६.० रु पेक्षा जास्त दराने विकणे , युरीया सोबत ईतर खते जबरदस्ती ने घेण्यास भाग पाडणे व युरीया दुकानात असुन ही विक्री करण्यास नकार देणे, या सारखे प्रकार आढळून येत असल्यास शेतकरयांनी जिल्हा स्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार(9307076107) करण्याचे आवाहन भरारी पथक प्रमुख श्री.पद्मनाभ म्हस्के यांनी शेतकरयांना केले आहे.तक्रारदाराचे नाव शेवटपर्यंत गोपनिय ठेवण्यात येणार आहे.