चाळीसगाव तालुक्यातील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल बिलाखेड येथील विद्यार्थी प्रथमेशराजे प्रमोद सोनवणे याची भुसावल येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता सहावी साठी निवड झाली असून तो जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रमोद यशवंतराव सोनवणे व सौ ऋतुजा प्रमोद सोनवणे यांचा कनिष्ठ सुपुञ आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा २०२५ विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन निवड झाल्याबद्दल सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलच्या प्राचार्या, शिक्षक यांच्यासह मान्यवरांकडूनअभिनंदन करण्यात आले आहे. तो कळमडू येथील सेवानिवृत्त शिक्षक यशवंतराव भगा सोनवणे व चाळीसगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ रंजनाताई यशवंतराव सोनवणे यांचा नातू तर चाळीसगाव अंधशाळेचे प्राचार्य सचिन सोनवणे, शिक्षिका गजश्री सोनवणे यांचा पुतण्या आहे.डॉ प्रमोद सोनवणे हे स्वतः भुसावळ नवोदय येथे शिकले असून मोठा चिरंजीव सिद्धेशराजे नवोदय विद्यालय भुसावळ येथेच इयत्ता दहावीत शिकत आहे. आणि आता प्रथमेशराजे याची देखील नवोदयसाठी निवड झाल्याने आमची हॅट्ट्टिक पुर्ण झाल्याने अत्यानंद झाल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली. तसेच बाप आणि दोघेही मुले नवोदय चॅम्पियन्स ठरले आहेत असे तालुक्यातील दुर्मिळ उदाहरणच म्हणता येईल.नवोदय तज्ञ सुभाष उगले सर यांचे त्यास मार्गदर्शन लाभले आहे.