29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. सागर गरुड ठरले आकाशातील देवदूत हवेत उडणाऱ्या विमानात वाचवले रुग्णाचे प्राण

पाचोरा
येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड हे पाचोरा जामनेर परिसरासाठी आरोग्यदूत आहेतच. परंतु एका चित्त थरारक प्रसंगात हवेत उडणाऱ्या विमानात डॉ. गरुड यांनी हृदयविकार आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचवले. आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या डॉ. गरुड यांनी स्थळ, काळ, वेळ व रुग्णाचा जात, धर्म, पंथ न विचारता यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान दिले. रुग्णाच्या प्राण वाचवणाऱ्या डॉ. सागर गरुड यांच्या रूपातील आकाशातील देवदुतला सलाम.पाचोरा (जि. जळगाव) येथील डॉ. सागर गरुड (विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल) डॉ.अमोल जाधव (दिशा डेंटल केअर) डॉ.अतुल महाजन (माऊली हॉस्पिटल) हे तीनही डॉक्टर आपल्या परिवारासोबत सिक्कीम येथे सहलीला गेले होते. सिक्कीम सफारीचा त्यांचा चित्त थरारक अनुभव हा एक वेगळा विषय आहे.

शनिवार दिनांक 31 रोजी सकाळी 11 वाजता इंडिगो कंपनीच्या 6E334 या विमानाने तिघेही डॉक्टर सहपरिवार कोलकत्याहून हैदराबाद कडे निघाले. कोलकत्याहून विमानाने हवेत उड्डाण केल्याबरोबर हैदराबाद येथील 55 वर्षीय सहप्रवाशाला अत्यंत अत्यवस्थ वाटायला लागले आणि तो खुर्चीवरून खाली पडला व बेशुद्ध झाला. क्षणाचाही विलंब न करता डॉ. सागर गरुड मदतीला धावले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुन्हा आसनावर बसवले. विमान पूर्ण उंचीवर उडत असतानाच त्या प्रवाशाला पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता व वैद्यकीय सेवेचा अनुभव असल्याने डॉ. गरुड त्यांनी रुग्णाची लक्षणे ताबडतोब ओळखली. रुग्णाच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात घेऊन डॉ. सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता विमानात उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी मेडिकल किट मधील जुजबी औषधोपचार, सलायन, इंजेक्शन यांच्या मदतीने त्या रुग्णाचे प्राण वाचवले. रुग्णाला होणाऱ्या उलट्या व हृदयविकाराच्या वेदनांमुळे होणारा त्रास बघून रुग्णाच्या परिवाराने खूप हंबरडा फोडला. संपूर्ण विमानात भीतीचे वातावरण पसरले होते. डॉ. अमोल जाधव व डॉ. अतुल महाजन यांची मदत मोलाची ठरली. हैदराबाद पोहोचेपर्यंत हृदयविकारात येणाऱ्या मृत्यूचा धोका पूर्णपणे टाळण्यात डॉ. गरुड यशस्वी झालेत.याबाबत विमानाच्या व्यवस्थापने तातडीने हैदराबाद येथे संपर्क साधला. हैदराबाद विमानतळावर तातडीने ॲम्बुलन्स बोलावून रुग्णाला तेथील अपोलो हॉस्पिटलला दाखल केले. हवेत उडणाऱ्या विमानातच रुग्णाचे प्राण वाचवल्याबद्दल विमानातील सर्व प्रवाशांनी आकाशात देवदूत च्या रूपाने धावून आलेल्या डॉ. सागर गरुड यांचे अभिनंदन केले. पाचोरा येथील तीनही डॉक्टरांच्या आयुष्यातील हा चित्त थरारक अनुभव चीरस्मरणीय आहे. डॉ. सागर गरुड यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!