26.6 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युवा शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

पाचोरा – आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व्हावे तसेच शेतीमध्ये उदासीनता आलेल्या तरुण शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळावी,त्यामधून कृषी उद्योजक निर्माण व्हावा तसेच शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योगच्ची निर्मिती व्हावी या हेतूने पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने युवा शेतकरी कृषी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता तालुक्यातील राजुरी येथे हे कृषी विषयक चर्चासत्र संपन्न होणार आहे.यामध्ये पेरणीपूर्व तयारी पिकांची निवड,मशागत, काढणी,साठवण व विक्री आदी बाबींवर मार्गदर्शक चर्चा यावेळी होणार आहे. विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचे युवा शेतकऱ्यांना उद्देशून बहुमूल्य मार्गदर्शन होणार असून वाडी शेवाळे येथील शेतीनिष्ठ शेतकरी सुनील रंगराव पाटील यांचे कृषि विषयक चर्चासत्र तसेच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील, उपक्रमशील शेतकरी समाधान मालकर मयूर वाघ यांचे अनुभव कथन प्रसंगी होणार आहे.कृषी क्षेत्रातील संधी व समाधान तसेच कृषी उद्योजकता या मुद्यावर आधारित संवाद या मेळाव्यात होणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,बाजार समिती सभापती गणेश भीमराव पाटील. उपसभापती प्रकाश अमृत पाटील तसेच भाजपा उपजिल्हाध्यक्ष मधुकर काटे उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण रामराव पाटील,मयूर वाघ समाधान मालकर,भीमशक्ती शिवशक्ती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील विनोद तावडे बाजार समिती सचिव बी बी बोरुडे संचालक सुनील युवराज पाटील राहुल पाटील लखीचंद पाटील प्रकाश तांबे विजय कडू पाटील मनोज सिसोदिया युसुफ भिकन पटेल आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!