सदर घटना दि.१४/६/२०२१ रोजी मौजे लोन पिराचे ता. भडगाव शिवारातील फिर्यादीच्या शेतात सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली सर्व आरोपींनी सहमत केले. शेतीचे वाटे हिसेच्या कारणावरून फिर्यादी हे शेतात काम करीत असताना आरोपी त्यांनी शेतात अनधिकृत पणे प्रवेश करून फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागे व उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ मारहाण केलीतसेच इतर आरोपींनी चापटा बुक्क्यानी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हातापायावर तोंडावर मारहाण केली. याबाबत फिर्यादीने भडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. यावरून गु.र.नं. १४२/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर खटल्याची सुनावणी दरम्यान एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी अभियोग पक्षातर्फ आर.ए. रंगरेज यांनी प्रभावी रित्या काम पाहिले. पैरवी अधिकारी पो.उ.नि.कंडारे व केस वॉच पो.ना.मनोज माळी यांनी खटला साबित करण्यासाठी अभियोग पक्षास सहाय्य केले.भडगाव न्यायालयातील न्यायाधीश व्ही.एस.मोरे यांनी आरोपी विक्रम शंकर पाटील व इतर तीन सर्व रा. गोंडगाव ता.भडगाव यांच्याविरुद्ध भा.द.वी कलम ३२३,४४७,५०४,३४ अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने सहा महिने साध्या कैदीची शिक्षा व प्रत्येकी तीन हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षासुनावली (संग्रहितछायाचित्र)