मुख्य संपादक फकिरचंद पाटील
दिनांक १६ मे २०२५ रोजी मा. सहसंचालक पुणे उपसंचालक नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव व ता.वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशान्वये आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड व सर्व उपकेंद्र येथे आरोग्य कर्मचारी यांनी मा.डॉक्टर वैद्यकीय डॉ. प्रशांत शेळके डॉ.अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डेंगू दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रथम डेंगू प्रतिबंध उपायोजना करण्यासाठी प्रतिज्ञा देण्यात येऊन सर्वांना या आजाराविषयी माहिती डेंगू तापाचा प्रसार कसा होतो या आजाराची लक्षणे कोणती या आजाराची लक्षणे आढळल्यास काय करावे हा आजार एडिस इजिप्ती या डासाच्या प्रादुर्भावामुळे होतो याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण करून घरातील एक दिवस सर्व भांडे रिकामे करून घासून पुसून स्वच्छ करावे याप्रमाणे माहिती देण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेळके डॉ.अभिजीत पाटील श्रीमती गावित सिस्टर आरोग्य सहायिका बी एल गोसावी आरोग्य सहाय्यक केंदळे नाना लॅब टेक्निशियन एस बी शिंपी आरोग्य सेवक व आरोग्य सेविका आणि आशा वर्कर व ग्रामस्थ हजर होते