भडगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी कार्यालय परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लागवड व कृषी विभागाच्या विविध योजनेचे फलक आणि कृषी संबंधित स्लोगन लावून कार्यालय परिसर एखाद्या बागेसारखा फुलवून कार्यालयात येणाऱ्यांचा आकर्षणाचा विषय ठरत आहे. सुखदेव गिरी यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यात लांब असल्याने नेहमी गावी जाणे जमत नसल्याने त्यांनी शासकीय सुट्टीचे दिवस व कार्यालयीन वेळेनंतर चा वेळ कार्यालयास झाडे लावणे व जगविणे या कामी देऊन मागील सात वर्षात त्यांनी कार्यालय परिसरात सीताफळ, जांभूळ, वड,अशोक ,सप्तपर्णी, करंज, पिंपळ ,उंबर ,बेल ,लिंब, गुलमोहर, चिंच व बदाम इत्यादी विविध वृक्ष तर काही शोभेची झाडे लावून कार्यालय परिसर घरच्या अंगणाप्रमाणे फुलविलेला आहे .सुखदेव गिरी यांना ही प्रेरणा तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख कृषी उपसंचालक अनिल भोकरे कृषी अधिकारी संभाजी ठाकूर आत्माचे कुर्बान तडवी यांच्याकडून मिळाली यात भरीत भर म्हणून तत्कालीन नव्यानेच आलेले तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनाही झाडे झाडे लावण्याची आवड असल्याने कार्यालयात भेटीनिमित्त येणारे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर , कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प संचालक कुर्बान तडवी , उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख, नंदकिशोर नाईनवाड, या अधिकाऱ्यांमार्फत तसेच कार्यालयातील कर्मचारी यांच्यामार्फत वृक्ष लागवड करण्यात आली ती सर्व झाडे सुखदेव गिरी यांनी डोक्यावर, सायकलवर ,टॅंकरने पाणी आणून वाढवली .यात वृक्ष लागवड करणारे अधिकारी सेवानिवृत्त व पदोन्नत झाले परंतु योगायोगाने हे अधिकारी या कार्यालयास आल्या नंतर सुखदेव गिरी यांनी मोठ्या आनंदाने त्यांना आवर्जून त्यांनी लावलेले झाडे दाखवतात , आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप हीच सुखदेव गिरी यांना कार्याची प्रेरणा देऊन जाते असे गिरी म्हणतात.शेतकऱ्यांसाठी बनविला अभ्यंगत कक्षभडगाव कृषी कार्यालय छोटे असल्याने येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी अडचण निर्माण होत असे हे गिरी यांनी ओळखून मनोमन कल्पना आखून सहा वर्षांपूर्वी कार्यालयासमोरच अंदाजे एक हजार स्क्वेअर फुट आयताकार जागेत चौफेर सावली निर्माण करणारी १६ झाडे लावून नैसर्गिक सभा मंडप तयार करून येणाऱ्या व्यक्तीस सुंदर बागेमध्ये बसल्याचा अनुभव मिळत आहे.कृषी विभागाची वनशेती नावाची योजना होती ,ही सुखदेव गिरी यांनी शंभर ते सव्वाशे सीताफळांची रोपे तयार करून एका रांगेमध्ये लागवड करून वनशेती योजनेचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष शेतकऱ्यांसमोर उभे केले. आज सर्व सिताफळ झाडास मोठ्या प्रमाणात फळ येत आहेत. अशाप्रकारे जवळपास ३०० झाडे गिरी यांनी जगविले असून त्या कामी त्यांना त्यांच्या मुलीनेही सुट्टीच्या दिवशी सोबत येऊन मदत केली आहे .गिरी यांनी त्यांच्या मुलीच्या दहाव्या वाढदिवसाला दहा बदामाची झाडे लावून मुलीच्या हाताने त्या झाडाला राखी बांधून अनोखा रक्षाबंधन साजरे करून त्या झाडावर ..झाड माझ्या लेकीचं अशी बनवलेली सुंदर पाटी पाहून लोकांमध्ये भावनिक आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.कार्यालय परिसरात विविध कृषी विभागाच्या योजनेचे फलक लावून महाडीबीटी वरील दहा योजना एकत्रित करून अर्ज एक योजना अनेक अशा प्रकारे फलक लावून महाडीबीटीवरील सर्व योजनांची एकत्रित ओळख पाहणाऱ्यांना होते याशिवाय इतर योजनांचा वेगळा फलक लावून या सर्व योजनेचे स्वतंत्र व सविस्तर माहितीचे बॅनर बोर्ड वर त्यांनी राबविल्या योजनेचे फोटोसह लावून योजनेच्या बाबीची संपूर्ण ओळख होऊन जाते. त्याचबरोबर कृषी विषयक वेगवेगळ्या योजनाची स्लोगन,म्हणी आकर्षक स्वरूपात लावून परिसराची शोभा आणखीनच वाढलेली आहे.गिरी यांना याबाबत विचारले असता तन, मन ,धनाने कार्य मनापासून आणि कार्यालय असून मन लावून योजना आखली आण वेळ व श्रम लावून पूर्ण करण्यात समाधान आहे.तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबेसुखदेव गिरी यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून शासनाच्या योजना शेतकऱ्यां च्या दारापर्यंत पोहोचवणारे हात म्हणजे कृषी विभाग ही स्लोगन त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे. गिरी यांचे हे कार्यालय सुशोभीकरण पाहून विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर विभागीय जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे यांनी सुखदेव गिरी यांच्या कार्याबद्दल कौतुक करून नक्कीच हे प्रेरणादायी कार्य आहे असे म्हटले आहे.