मुलांना मोबाईल देण्यापेक्षा हातात ज्ञानेश्वरी द्या ह भ प विवेक महाराज शास्त्री भगवानगड
पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे ८ वर्ष असून २ मे सप्ताहाची सुरुवात झाली होती व सांगता ९ मे रोजी करण्यात आली या सप्ताहासाठी ह भ प श्यामसुंदर महाराज सौंदाणे ह भ प जयवीर महाराज एरंडोल ह भ प कोमलसिंग महाराज सुराणा ह भ प नारायण महाराज भडणेकर ह भ प अनंत महाराज कजवाडे. ह भ प दीनानाथ महाराज सावंत सटाणा
ह भ प अशोक महाराज घाटशेंद्रा यांना कीर्तनाचा लाभ देण्यात आला या सप्ताहासाठी आदिशक्ती मुक्ताई भजनी मंडळ वेरूळ बुद्रुक तसेच ह भ प विवेक महाराज शास्त्री भगवानगड यांचे सहकार्य लाभले