एक महिन्याच्या आत पानद रस्ते पूर्ण करा नाहीतर कारवाईला सामोरे जा
आधुनिक केसरी प्रतिनिधी फकिरचंद पाटील
पाचोरा दिनांक ७/५/२०२५ रोजी पानद रस्त्या संदर्भात किशोर आप्पा पाटील तसेच प्रांत अधिकारी यांनी मीटिंग बोलवली होती सदरील विषय हा तीन वर्षापासून चालू आहे तरी पानद रस्ते पूर्ण होत नाही यामागचे कारण काय आहेत ते जाणून घेण्यासाठी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बसलो आहे मला कुठलेही कारण सांगू नका शेतीत जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ते नाही प्रत्येक गावात गेलो की पहिले पानद रस्त्यांचा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे कुठलेही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात माननीय आमदार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
यावेळी पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे .पाचोरा तहसीलदार बनसोडे साहेब तसेच तहसीलदार भडगाव …पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर मा जिल्हा परिषद सदस्य मधु काटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहुल नाना सुनिल आबा पाटील प्रविण भाऊ ब्राह्मणे
तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते प्रांत अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे लवकरात लवकर एक महिन्याच्या आत पानद रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला पाहिजे सदरील काम लवकरात लवकर सुरू करून इंजिनिअर यांना सुद्धा सूचना दिल्या आहे