29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा

मुख्य संपादक फकिरचंद पाटील

ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी पाचोरा येथे कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांनी मा. किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार केला. यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्ष मा. संजय गोहिल, माजी लोकनियुक्त जवखेडे सीम सरपंच दिनेश बापुराव आमले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सायबर सेक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स चे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन हि संस्था 2010 सालापासून पाचोरा शहर व ग्रामीण भागात काम करत आहे. संस्थे आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती गोकुळ सोनार यांनी दिली. . महिलांना विविध उद्योग व्यवसाय प्रशिक्षण संस्था घेत असते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर, पिक विमा योजना,माती पाणी परीक्षण, फार्मर्स क्लब तसेच शेतकरी अभ्यास दौरा असे विविध प्रकारचे ट्रेनिंग संस्था राबवित असते. सॅनिटरी नॅपकीन मॅन्युफॅक्चरींग युनिट या माध्यमातून महिलांना त्यांच्या मासिकपाळी च्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिन व इन्सुलेटर विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत. वायफाय चौपाल योजने अंतर्गत गावोगावी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डिजिटल लिट्रसी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना विविध सेवा सुविधा या विनासायास गावातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे. ग्रामीण युवकांसाठी इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थे मार्फत स्किल इंडिया च्या अंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण, शिवणकाम, ब्युटीपार्लर असे विविध कोर्सेस राबविण्यात येत आहेत.यावेळी मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांच्या धडपडीचे कौतुक करत त्यांच्या कामाचे अभिनंदन केले. सायबर सेक्युरिटी प्रशिक्षण खरंच खूप गरजेचे का आहे , डिजीटल इंडिया च्या धर्तीवर देशाला महासत्ता बनविण्यासाठी डिजिटल शिक्षण आवश्यक आहे असे मार्गदर्शन किशोर आप्पा पाटील यांनी केले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी सर्व पत्रकार बांधव , विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक संस्थेचे स्टाफ मेंबर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिष्णा बोरूडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर बाविस्कर, अश्विनी पाटील, तुळशीराम शेरमाळे, समर्थ मोगरे यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!