गिरड गावासह गिरड-आमडदे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातल्या माय-बाप जनतेने दिलेल्या प्रेमाने भारावुन गेलो… मा.आमदार आबासाहेब चिमनराव पाटील भडगांव तालुक्यातील गिरड येथे आमदारपदी निवड झाल्याबद्दल मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य नागरीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी मा.जि.प.सदस्य दिनकरआबा पाटील, मा.सभापती अशोकदादा पाटील, भडगांव शिवसेनेचे तालुकाप्रमुख भुराआप्पा पाटील, मा.तालुकाप्रमुख देविदासतात्या पाटील, शेतकी संघ जयवंतदादा पाटील, आमडदे येथील संभाजी भोसले, गिरड मा.सरपंंच मराठाआबा पाटील, पिंपरखेड येथील बाळासाहेब पाटील, पारोळा तालुका शेतकी संघाचे संचालक साहेबरावदादा पाटील, भातखंडे येथील भास्करनाना पाटील, गिरड येथील पुंडलिकनाना पाटील, भट्टगांव सरंपच देवकाबाई परदेशी, पिंपळगांव सरपंच जयराम पाटील, पिंपरखेड सरपंच अरूण बडगुजर, गिरड मा.सरपंच प्रकाश पाटील, वाक मा.सरपंच स्वप्निल पाटील, शिंदी मा.सरपंंच डॉ.जे.डी.शेख, पिंपरखेड मा.सरपंंच अजय महाजन, विकासो मा.चेअरमन आनंदराव सिंहले गुरूजी, मा.सरपंच अनिल पाटील, पिंपरखेड उपसरपंच राजु कोळी, मा.सरपंंच अमृतबापु पाटील, मधुआण्णा पाटील, माणकी सरपंच रविंद्र चौधरी यांचेसह गिरड व पंचक्रोशितील ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेना, युवासेना व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महारांचा प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करत वदंन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, ग्रामस्थांचा वतीने आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरीक सत्कार, जिल्हा पिक फेड्रेशनवर बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.यासमयी मा.जि.प.सदस्य दिनकरआबा पाटील, पिंपरखेड येथील सुधीर(बाळासाहेब) पाटील, मा.तालुकाप्रमुख देविदासतात्या पाटील, आनंदराव सिंहले, आमडदे येथील संभाजी भोसले, पिंपळगांव सरपंच जयराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मुख्य मार्गदर्शन केले.गिरड गावासह गिरड-आमडदे जिल्हा परिषद गटातील माय-बाप जनतेने मा.आबासाहेबांना गेल्या ४० वर्षांपासुन निस्वार्थ प्रेम दिले. जसे प्रेम मा.आबासाहेबांना या माय-बाप जनतेने दिले, त्यापेक्षा अधिक गेल्या वेळीचा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य देत शुभाशिर्वाद दिले. एवढं अपार प्रेम बघुन कधी-कधी चिंता देखील होते, या माय-बाप जनतेच्या आपल्याकडुन असलेल्या आशा, अपेक्षा आपण पुर्ण करू कि नाही. आजवर एवढं प्रेमाचा व आशिर्वादाचा वर्षाव मी देखील प्रथमच अनुभवतो आहे. या प्रेमाने, स्नेहाने, आशिर्वादाने मी अक्षरशः भारावुन गेलो.मा.आबासाहेबांचा गेल्या वेळीचा कार्यकाळात आपण गिरड गावाच्या वैभवात भर घालणारी अनेकानेक विकासकामे मंजुर करून पुर्ण केली. येत्या काळात या ठिकाणी मागणी झालेल्या उर्वरित कामांना प्राधान्याने पुर्ण करण्यासाठी सदैव कटीबद्द असल्याचे या उपस्थित माय-बाप जनतेला ठोस आश्वासित केले.