29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड.

अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड.

मिरज -सांगली येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय अधिवेशन मोठया थाटात पार पाडले. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटिल, मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटिल, आमदार गोपीचंद पडळकर,विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप घुगे, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेश संघटक संजय भोकरे.राज्यसरचिटणीस डॉ. विश्वास राव आरोटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे,महाराष्ट्र राज्य पत्रकर संघ डिजिटल चे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या उपस्थितीत जळगाव येथील न्यूज 24 चॅनल चे प्रतिनिधी अयाज मोहसीन यांची संघटनेच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती प्रदान करण्यात आली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अयाज मोहसीन यांनी सर्वांचे आभार मानत सर्व ज्येष्ठ आणि युवा पत्रकारांच्या सहकार्यातून, सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, सोशल मिडीया च्या मार्गदर्शन, सहकार्य आणि सहकार्यातून पत्रकार आणि कुटुंबियांची, विशेषतः आरोग्य क्षेत्रात सेवा करणार. पत्रकारांसाठी ‘सेवा, सुरक्षा,समानता” या तत्वावर कार्य करणार… लवकरच जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदांची निवड करणार असून इछूकांनी अयाज यांच्याशी 9595529600 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
या निवडीचे स्वागत प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय संघटक भुवनेश दुसाने, सुनिल भोळे आणि विविध क्षेत्रात केले जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!