29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

अमोल शिंदेंची साद.. जनतेचा उदंड प्रतिसाद आलोट गर्दी

 

पाचोरा भडगाव येथील जनतेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे (निशाणी- शेतकरी) यांनी काल दिनांक 6 रोजी पाचोरा ग्रामीण परिसरात प्रचार दौरा केला. या प्रचार रॅलीत अमोल भाऊंनी जनतेला मतदानासाठी साथ घातली. प्रत्युत्तरात जनतेने गावोगावी उदंड प्रतिसाद दिल्याने अमोल शिंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र दिसून आले.अमोल भाऊ शिंदे यांनी काल तारीख 6 रोजी सकाळी पाचोरा तालुक्यातील वडगाव सतीचे, चुंचाळे, तर पिंपळगाव बु, नगरदेवळा- सिम व निपाणे या गावात प्रचार दौरा केला.तर सायंकाळी मोहाडी, पहाण, नांद्रा, कुरंगी व माहिजी इत्यादी गावांमध्ये आपला प्रचार दौरा पूर्ण केला. याप्रसंगी अमोल भाऊ शिंदे यांचे सोबत पंचायत समिती माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील, ॲड. योगेश पाटील तसेच प्रत्येक गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. गावोगावी झालेल्या प्रचार रॅलीत अमोल भाऊ शिंदे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अमोल पंडितराव शिंदे यांचा अनुक्रमांक ७ व निशाणी शेतकरी बद्दलची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी माता-भगिनींना करून दिल्याने अमोल शिंदे यांचा विजय आता निश्चित झाला आहे. गावोगावी मिळणारा प्रतिसाद, अमोल शिंदे यांचा वाढता जनसंपर्क यातून अमोल शिंदे यांच्या रॅलीला गावोगावी खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात असून या परिवर्तनाच्या लाटेत अमोल पंडितराव शिंदे हा एक आश्वासक चेहरा म्हणून जनतेने निश्चित केला आहे. अमोल शिंदे यांच्या बद्दलच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांचा विजय यंदा निश्चित झाला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!