29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा शहरात वैशालीताई सुर्यवंशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

प्रचार फेरीतून परिवर्तनाचा जागर

पाचोरा –  विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रचार फेऱ्यांनी एकच धुरळा उडवून दिला आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातून देखील ताईंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या परिवर्तनाच्या आवाहनाला नागरिकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.पाचोरा विधान सभेच्या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचा पाचोरा शहरातही झंझावात प्रारंभ झाला आहे. ग्रामीण भागाप्रमाणे पाचोरा शहरातही वैशालीताई सुर्यवंशी यांना मतदारांकडुन भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरी दरम्यान वैशालीताई सुर्यवंशी यांचे महिला मतदारांकडुन हळदी कुंकू लावुन औक्षण करण्यात येत आहे. मतदार संघाच्या समग्र विकासासाठी वैशालीताई सूर्यवंशी यांनी साद घातली असून पाचोरे कर नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.आज पाचोरा शहरातील भडगाव रोड, पुनगाव रोड, पंपिंग रोड, रिंग रोड यासह रेल्वे भुयारी मार्गाच्या पलिकडे मुख्य बाजार पेठ, कृष्णापुरी, गांधी चौक, आठवडे बाजार, सराफ बाजार, हुसेनी चौक, जामनेर रोड या संपूर्ण भागात काॅलनी, गल्ली गल्लीत वैशालीताई सुर्यवंशी यांची झंझावाती प्रचार रॅली ने विरोधकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. यामुळे यंदा पाचोरा मतदार संघात परिवर्तन घडवून वैशालीताई सूर्यवंशी निश्चितपणे आमदार बनणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आता सुरू झाली आहे.या प्रचार रॅलीत तालुका प्रमुख अॅड. दिपक पाटील, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, प्रशांत पाटील, राजेश काळे, राजेंद्र राणा, पप्पू जाधव यांचेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडीच्या व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!