भडगाव पाचोरा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांनी भडगाव शहरासह परिसरात निवडणुकीत प्रचार रॅलीने आघाडी घेतली असून त्यांच्या रॅलीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आज दिनांक 4 नोव्हेंबर वार सोमवार रोजी दुपारी ४ वाजेनंतर भडगाव शहरातील वरची पेठ भागातील हनुमान मंदिर या ठिकाणी नारळ वाहून तिथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर वरची पेठ , भिल्ल वस्ती , खालची पेठ , नविन प्लॉट एरिया , मेघा सिटी इत्यादी ठिकाणी फिरून शेवटी पेठ चौफुली येथे प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी ठिकठिकाणी डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचे औक्षण करण्यात आले. प्रचारादरम्यान नानासाहेब प्रतापराव हरी पाटील ,बाळासाहेब जगदीश अशोक पाटील ,डॉ. कमलेश पाटील ,डॉ. पूनमताई पाटील, स्वराज्य पक्षाचे जिल्ह्याचे समन्वयक चेतन पाटील तसेच प्रतीक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . रॅलीला उस्फुर्त असा प्रतिसाद भडगाव शहरात मिळत असून मतदारांनी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहे. या रॅलीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती