29.2 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

आपणच सुचवा आपणांस काय हवे?जाहीरनाम्यासाठी अमोल शिंदे यांचे मतदारसंघातील जनतेस आव्हान

येथील पाचोरा-भडगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी थेट पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेला आवाहन केले आहे की इतर उमेदवारांप्रमाणे निवडणुकीत गाजावाजा करून जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आणि निवडून आल्यावर तो जाहीरनामा विसरून केवळ स्वतःचाच विकास करायचा अशा विचाराचा मी नसून जनतेसाठी काय करावे हे जनतेच्या सूचनेनुसार मी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.असे अमोल शिंदे यांनी सांगितले आहे.त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध समस्या निराकरना साठी व मालाला योग्य तो बाजार भाव मिळवून देण्यासाठी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी, तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी, व्यापाऱ्यांच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी, महिलांच्या स्वावलंबनासाठी व सुरक्षिततेच्या हमीसाठी मी काय काम करायला पाहिजे हे जनतेने सोबत दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर सुचवावे त्यामध्ये आपले प्रश्न, समस्या व भविष्यात अपेक्षित असलेल्या विकासात्मक उपाययोजना ही सर्व माहिती 8698811919 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी सोबत आपले नाव,गाव,मोबाईल नंबर देखील पाठवावा असे आवाहन करून त्यानंतर जनतेच्या सूचनेनुसार ते जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.प्रत्यक्षात कृती देखील करून दाखवेल असे वचन त्यांनी यावेळी केले आहे. अशा पद्धतीने जनतेकडून सर्व समस्या सूचना व अपेक्षित कामे मागवून जाहीरनामा प्रसिद्ध करणारे व ते पूर्णत्वास नेण्याचे वचन देणारे अमोल शिंदे हे एकमेव उमेदवार असून जनता देखील त्यासाठी नक्कीच प्रतिसाद देईल.असे अपेक्षित आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!