29.2 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

आज भडगावात महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी बाजार चौकातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ

.शहरात रॅली काढून जनतेचे आशिर्वाद घेतले. रॅलीला भडगावकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला
आज भडगाव शहरात महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी बाजार चौकातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याठिकाणी शहरातील शिवसेना, भाजप, राष्टरवादी काॅग्रेंस व रिपाईच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयाचा संकल्प करत शहरात रॅली काढली. रॅली बाजार चौकापासून रथ मार्गाने काढण्यात आली. घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे अनेक ठीकाणी औक्षण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे भडगाव शहर प्रचार प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र महाजन, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील,भाजपचे शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, अतुल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे,डाॅ.प्रमोद पाटील, बापु पाटील, युवासेनेचे दुर्गेश वाघ, इमरान अली सय्यद, डाॅ.वासिम मिर्झा, जगन भोई, संतोष महाजन, नितीन महाजन, अतुल परदेशी, निलेश पाटील, देविदास अहिरे, गोंडगावचे सरपंच राहुल पाटील, बाजार समीतीचे उपसभापती पी.ए.पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!