भडगाव/ पाचोरा आज दिनांक २७ ऑक्टोबर वार रविवार रोजी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या निवासस्थानी पाचोरा भडगाव तालुक्यातील प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली यावेळी पाचोरा भडगाव पत्रकार ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते सर्व पत्रकारांनी तालुक्यातील व मतदार संघातील अनेक प्रश्नांबाबत प्रश्नोत्तरे केली. यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव हरी पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर दिलेत. तसेच 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीराजे हे पाचोरा येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये पाचोरा भडगाव विधानसभेसाठी प्रताप हरी पाटील हे अर्ज दाखल करणार आहेत सर्व मायबाप जनतेला प्रताप हरी पाटील यांनी फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे तसेच 29 ऑक्टोबर रोजी फॉर्म भरण्यासाठी भडगाव येथून रॅली ची सुरुवात होणार आहे मला भरभरून मतांनी विजयी करा व मला
आपल्या सेवेची संधी द्या असे प्रतिपादन प्रताप हरी पाटील यांनी केले आहे प्रसंगी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, डॉ. पुनमताई प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक चेतन पाटील, प्रतीक पाटील , विनायक देशमुख, नानासाहेब देशमुख ,नितीन पाटील, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.