29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

  1. येथील पाचोरा-भडगाव विधानसभेचे नियोजित उमेदवार अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ पूजाताई अमोल शिंदे यांच्या प्रचार रॅलीने आज पाचोरेकरांचे लक्ष वेधले. अवघ्या एक दिवस आधी नियोजन केलेल्या या प्रचार रॅलीत पाचोरा शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहर दणाणून सोडले.आज दिनांक 23 रोजी सकाळी अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ पूजाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील आठवडे बाजार, मोची गल्ली, मच्छी बाजार, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, जवाहर हाऊसिंग सोसायटी, सम्राट अशोक नगर, गुरुदत्त नगर, बाहेरपुरा परिसरातील काही भाग, छत्रपती संभाजी नगर व शिंपी समाज मंगल कार्यालय परिसरात ही रॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात झाल्याबरोबर परिसरातील माता, भगिनी व युवकांनी स्वयंस्फूर्तीने शेकडोच्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदवला. रॅली दरम्यान ठीक ठिकाणी स्थानिक भगिनींनी पूजाताई शिंदे यांचे औक्षण केले. रॅली दरम्यान पूजाताई शिंदे यांनी माता-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचा आशीर्वाद घेतला. ज्येष्ठ माता-भगिनींनी अमोल भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद दिला. रॅलीने पाचोरा शहरातील वातावरण बदलून गेले. अमोल भाऊ शिंदे यांचे फोटो असलेले कट आउट आणि घोषणा यामुळे रॅलीच्या मार्गात चैतन्य निर्माण झाले.या प्रारंभिक पण अभूतपूर्व प्रचार रॅलीत पूजाताई शिंदे यांची समवेत शहराध्यक्ष ललिता पाटील, तालुकाध्यक्ष स्वाती पाटील, सोशल मीडिया प्रमुख पिंकी जीनोदिया, ज्योतीताई चौधरी, रोहिणीताई शिंदे, जयाताई काटकर, अंजलीताई काटकर ज्योतीताई नागणे ज्योतीताई पाटील, जयश्रीताई मराठे, सोनालीताई वानखेडे, रंजनाताई पाटील, रीनाताई पाटील, सरिताताई पाटील, सविताताई पाटील, सतीशबापू शिंदे,जीभाऊ हटकर,प्रकाश चौधरी, किशोर आबा पाटील, दिपक माने, विष्णू अहिरे जगदीश पाटील, समाधान मुळे, विशाल सोनवणे जगदीश पाटील, रोहन मिश्रा संदीप पाटील,भागवत पाटील,सचिन चौधरी, पिंटू चौधरी, किशोर पाटील, सागर महाजन, किशोर चौधरी,यासह शेकडो महिला व युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये
पूजाताई की रॅली झाकी है.!
अमोल भाऊ का सैलाब बाकी है.!

जितेगा भाई जितेगा, अमोल शिंदे जीतेगा.
यासह अनेक चैतन्यदाई घोषणांनी पाचोरा शहरातील परिसर दणाणून गेला

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!