पाचोरा व भडगाव शहर व तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदारांकडुन स्मार्ट मिटर लावण्याचा अनागोंदी कारभार सुरु असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सुप्रीम कोर्टाने ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मिटर लावण्यास मनाई केलेली असताना, ठेकेदारांकडुन गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जबरदस्तीने मीटर बदलेले जात आहेत. याबाबत महावितरणच्या ठेकेदारांना विचारणा केली असली, तरी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, केवळ तांत्रिक बिघाड किंवा ग्राहकांच्या तक्रारी असल्याच स्मार्ट मिटर लावण्याची परवानगी आहे. तसेच, मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जबरस्तीने स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट मीटर बदलत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे ठेकेदारांचा हा प्रकार महसुल वाढवण्याचा डाव आहे का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तरी, हे सदरील स्मार्ट मीटर पाचोरा, भडगाव तालुका तसेच पाचोरा-भडगाव शहरीभागात कुठेही स्मार्ट मीटर लावु नये, तसे केल्यास आम्ही शिवसेना पाचोराच्यावतीने महावितरण कंपनीच्या ठेकेदारांच्या स्मार्ट मीटर बळजबरीने बसविण्याच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आता पुन्हा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ तसेच पाचोरा भडगाव आमदार किशोर आप्पा पाटील अमेरिका दौऱ्यावर असतांना ते मतदार संघात परत आल्यावर महावितरणची बैठक घेऊन जो निर्णय देतील तोवर कोणीही स्मार्ट मीटर बसू नये असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरजी बारावकर यांनी केले आहे या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सुमित दादा सावंत बंडू भाऊ सोनार तसेच शिवशक्ती भिमशक्ती उपजिल्हाप्रमुख शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते