‘संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मोत्सव’ १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. माऊलींच्या भव्य पालखी मिरवणुकीसह भजन, कीर्तन, पारायण अशा विविध कार्यक्रमांचे या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे.यंदा माऊलींचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्यभरात सर्वत्र माऊलींचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा व्हावा, अशी वारकरी बांधवांची मागणी होती. या मागणीची तात्काळ दखल घेत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मान्यता दिली. वारकरी बांधवांच्या सेवेसाठी आणि हितासाठी शिवसेना – महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे.