29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

भडगाव तालुक्यातील मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसरा हप्त्यासाठी पाच हजाराची लाच ग्रामसेवक व रोजगार सेवकाला भोवली

(संग्रहित छायाचित्र) भडगाव तालुक्यातील मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नमुना ८ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी मिळून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव (ACB) यांनी सापळा रचून आरोपींना पंचासमक्ष ५००० रुपयांची लाच स्वीकारताना आज दिनांक 23 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरात रंगेहात पकडले.या कारवाईत मांडकी गावचे ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा) आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी (वय ३८, रा. पाचोरा) या दोघांचा समावेश आहे. तक्रारदार हा मांडकी गावातील ३५ वर्षीय रहिवासी असून, त्यांना मंजूर झालेल्या घरकुल योजनेचा दुसरा हप्ता व गट नमुना ८ मिळवून देण्यासाठी आरोपींनी ६००० रुपयांची लाच मागितली होती.या तक्रारीची पडताळणी २३ जून २०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी तडजोड करत लाच रक्कम ५००० रुपये निश्चित केली. त्यानुसार, याच दिवशी ACB पथकाने नियोजित सापळा रचून दोघा आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर (ला.प्र.वि. जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव) करत आहेत.सापळा कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकात स.पो.उ.नि. दिनेशसिंग पाटील, स.पो.उ.नि. विलास पाटील, पो.नाईक हेमंत पाटील, आणि पो.नाईक सुभाष पावरा (ACB नंदुरबार) यांनी सक्रिय सहभाग घेतला.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (नाशिक परिक्षेत्र) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली.भ्रष्टाचाराविरोधात झालेली ही ठोस व यशस्वी कारवाई सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!