शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ सुंदर रांगोळी व फुग्यांची सजावट करून इयत्ता १ लीत प्रवेशित सर्व विद्यार्थी स्वागतासाठी संस्थाध्यक्ष मा. दादासाहेब डॉ. श्री. सुरेश बोरोले, संचालक मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले, संस्था उपाध्यक्ष श्री. अविनाश राणे, मुख्याध्यापक श्री. एम. व्ही. पाटील व मान्यवर पालक बंधू-भगिनी उपस्थित होते. शाळेतील शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वाराजवळ औक्षण केले व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, पेन्सिल देऊन स्वागत कण्यात आले. नंतर ढोल ताशाच्या गजरात सर्व विदयार्थ्यांना सभागृहाच्या आनंदी वातावरणात आणले. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. नंतर शासनातर्फे प्राप्त मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांनी केले. तसेच आदरणीय दादासाहेब व नानासाहेब यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.आनंददायी परिपाठात सर्व शिक्षकवृदांनी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना गायन केली. श्री. आर.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक परिचय करून दिला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत आनंददायी गीतांचे गायन व नृत्य केले. कार्यक्रमाचे संचलन श्री. प्रशांत पाटील यांनी केले. अल्पोपहारात शिरा व व्हेजिटेबल पुलाव वितरीत करण्यात आला.