स्वच्छता मोहीम आपली जबाबदारी स्वच्छता ठेवा डेंगूला पळून लावा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्य चिकत्सक डॉ.किरण पाटील,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या आदेशान्वये
दिनांक १६ मे रोजी चाळीसगाव शहरासह, ग्रामीण भागातील सर्व प्रा.आ.केंद्र आणि अंतर्गत उपकेंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिवस निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन आरोग्य शिक्षण देण्यात आले.शहरी भागात सह्याद्री ॲकडमी करगाव रोड तसेच ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे स्क्रीन वर हिवताप,डेंग्यू, चिकुनगुनिया इत्यादी कीटकजन्य आजाराविषयी व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. डेंग्यू विषयी प्रतिज्ञा म्हणण्यात आली.तसेच कीटकजन्य आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.सोबत ग्रामीण भागात डेंग्यू आजाराविषयी हस्तपत्रिका वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थांना प्रश्नोत्तरे स्वरूपात माहिती विचारण्यात आली.गावात कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.एक दिवस कोरडा दिवस पाळण्याविषयी नागरिकांना आव्हाहन करण्यात आले.रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.डेंग्यू आणि इतर कीटकजन्य आजार होऊ नयेत यासाठी काय काय खबरदारी घेण्यात यावी याविषयी माहिती देवून आरोग्य शिक्षण देण्यात आले.सदर कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर वर्ग _१,डॉ.प्रशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.वैदेही पंडित वैद्यकीय अधिकारी श्रेणी १,सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. विशेष सहकार्य हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांचे लाभले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून विशेष मेहनत चाळीसगाव शहरातील आरोग्य कर्मचारी विकास सोनवणे आणि दिपक ठाकरे,रमेश सानप यांनी घेतली. ग्रामीण भागात तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक,सेविका,आरोग्य सहायक,आरोग्य सहायिया,औषध निर्माण अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व इतर सर्व कर्मचारी वृंद सोबत सर्व आशा ताई यांनी घेतली. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव,ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव तसेच तालुक्यातील सह्याद्री अकॅडमी करगाव रोड,विद्यार्थी नागरिक यांचे लाभले.सदर कार्यक्रमासाठी गावातील नागरिक,क्लास मधील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी आणि आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी वृंद हजर होते.