मुख्य संपादक -फकिरचंद पाटील
दिनांक २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पहेलगाम अतिरेकी भ्याड हल्ल्याचा पाचोरा शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला या हल्याचे भारत सरकार जोरदार उत्तर देईलच हा अतिरेकी हल्ला भारताच्या अस्मितेवर हल्ला असून असे कोणतेही दुस्सहास हिंदुस्थानात खपवून घेतले जाणार नाही भारताचा अविभाज्य भाग कश्मीर हा केवळ जमिनीचा भाग नसून भारत मातेचा मुकुट आहे केंद्र सरकारने बेधडक कारवाई करत अतिरिक्यांचा बीमोड करावा अशी आग्रही मागणी या निमित्ताने पाचोरा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला