29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

सातगाव आणि परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

सातगाव सार्व पिंपरी आणि वाडी शेवाळे येथील प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद
पाचोरा – भडगाव मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक,पाणी पुरवठ्याच्या योजना,गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व गावांचा विकसित चेहरा निर्माण करू असा आशावाद आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. आज सातगाव डोंगरी सर्वे पिंपरी वाडी शेवाळे या परिसरात त्यांनी प्रचार रॅली पूर्ण केली. प्रसंगी बोलताना त्यांनी हा मनोगत व्यक्त केला. सातगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी गावातील सर्व प्रभागात फिरून मतदारांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सार्वे पिंपरी आणि वाडी शेवाळे येथे मतदारांच्या भेटी घेतल्या.दरम्यान या तीनही गावांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील व सहकाऱ्यांचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. असंख्य ठिकाणी माता-भगिनींनी औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,रमेश पाटील, सुनील पाटील, इंदल परदेशी,राहुल पाटील,भगवान पांडे,डॉ शेखर पाटील, डी एन पाटील,नंदू पाटील,दीपक पाटील,आनंद पाटील,हिलाल ओंकार पाटील,आप्पा वाघ,गोकुळ वाघ सागर गायकवाड,भीला पवार सागर चौधरी अमरसिंग परदेशी जावेद हवलदार राजू बोरसे किरण कोठावदे सुनील मराठे सतीश परदेशी अविनाश पाटील सरदार परदेशी उमेश बच्छे, अंकुश गवळी, ईश्वर जाधव,गोकुळ बैरागी रवी पाटील लक्ष्मण डांबरे,विश्वास पांडे,कैलास पांडे,अनिल पाटील,काशिनाथ तडवी,राजू चव्हाण,भैय्या पांडे,नितीन भोसले,वसंत गवळी, रज्जाक तडवी,अमोल बाविस्कर,रमेश पाटील,शांताराम वाघ,दीपक मोरे यांचे सह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!